Trending News : मासे (Fish) खाणं आरोग्यवर्धक मानलं जातं. माशांमध्ये प्रोटीन (Protein), विटॅमिन (Vitamin) तसच इतर पोषत तत्व असतात. मासे चवीनं खाणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र आता आम्ही जे सांगणार आहोत ते ऐकून खव्वयांना झटका बसेल. तुम्ही जर गोड्या पाण्यातील मासे (Freshwater fish) खात असाल तर तुमच्यासाठी ते अत्यंत हानीकारक आहे. अमेरिकेतल्या संशोधनात (Research in America) ही धक्कादायक बाब समोर आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही खाताय विषारी मासे? 
एन्व्हायरलमेंटल प्रोटेक्शन एजन्सी (Environmental Protection Agency) आणि अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनानं (Food and Drug Administration) अलिकडेच संयुक्तरित्या एक अहवाल प्रकाशित केलाय. त्यात नदी आणि तलावांमधील पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचं नमूद करण्यात आलंय. केमिकलमुळे प्रदूषणाचं प्रमाण इतकं वाढलंय. की या पाण्यातील मासे खाल्ल्यानं शरीरात विष (poison) पसरू शकतं असाही दावा करण्यात आलाय. सलग तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर हा अहवाल मांडण्यात आलाय. 




 




भारतात सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडे तसच बोंबील या माशांना खूपच मागणी आहे. याशिवाय गोड्या पाण्यातील मासेही चवीनं खाल्ले जातात. अमेरिकन संशोधकांच्या दाव्यावर भारतीय तज्ज्ञांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रदुषण असलेल्या तलावातील मासे खाल्ल्याने आपल्याला आजार होऊ शकतो असं भारतीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 


अमेरिकेच्या दाव्यामागचं सत्य काय?
माशांबाबतचा दावा अमेरिकन संशोधक आणि तिथल्या प्रशासनानं केलाय. भारतात असा कुठलाही अभ्यास झालेला नाही. गोड्या पाण्यात केमिकलचं प्रमाण वाढतंय हे काही अंशी खरं आहे. मात्र या पाण्यातील मासे खाल्ल्यानं गंभीर आजार होऊ शकतात हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 



त्यामुळे तुर्तास अमेरिकन संशोधकांच्या दाव्यानं भारतीयांनी लगेचच घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र नदी तसंच तलावांमधील वाढतं प्रदूषण लक्षात घेता येत्या काळात अमेरिकेप्रमाणेच भारतातही मासेप्रेमींवर संक्रात येऊ शकते हेही नाकारता येत नाही.