Mumbai Local Trending video: समाजातील तथाकथित रूढी परंपरेच्या बेड्या मोडण्यासाठी मोठं धाडस लागतं. या बेड्या मोडीस काढणाऱ्यांच्या कथा वाचायला नेहमीच रंजक असतात. अशातच 'द गाय इन अ स्कर्ट' म्हणून (the guy in a skirt) प्रसिद्ध असलेल्या शिवम भारद्वाज (Shivam Bhardwaj) याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Trending Video) पाहून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडे राहिल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवम एक फॅशन ब्लॉगर आहे आणि अप्रतिम मेकअप व्हिडिओ शेअर करतो. अशातच एका लोकलमध्ये कॅटवॉक (Catwalk In Mumbai local) करतानाचा एक व्हिडिओ त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. शिवम मुंबई लोकल आणि मेट्रोच्या डब्यात कॅटवॉक करताना दिसत आहे.


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Mumbai Local Trending video) शिवमने फ्लाई स्कर्ट आणि सनग्लासेस घातलाय. मुंबईच्या एका लोकल डब्यात शिवम कॅटवॉक करताना दिसतोय. शिवमला पाहून काही प्रवासी त्याच्याकडे टक लावून पाहतात. तर काहींनी मोबाईल काढून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय.


पाहा VIDEO -



शिवम स्वत:ला संघर्ष करणारा कंटेंट क्रिएटर मानतो. लोकांना त्याच्या स्कर्टसह त्याचा डेब्यू व्हिडिओ आवडला, त्यामुळे मी आनंदी आहे, असं शुभम म्हणतो.


काय म्हणाला शिवम भारद्वाज?


दरम्यान, मी तो स्कर्ट परिधान केलेल्या व्हिडिओला दिलेला प्रतिसाद धक्कादायक होता. त्यावेळी माझे फक्त 5000 फॉलोअर्स होते. आता ते 30 हजारावर आलेत. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पोस्टवरील बहुतेक कमेंट्स सकारात्मक आणि आश्वासक आहेत, जसं मला नेहमी हवं होतं, असं म्हणत शिवमने आनंद व्यक्त केलाय.