मुंबई : Mamata Banerjee Mumbai Visit: तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात दरम्यान त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. दिल्लीतही त्यांनी अनेक काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे. (TMC preparing to exit West Bengal, Mamta Banerjee on Mumbai tour from today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृणमूल काँग्रेसने भाजपशासित राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आहे. आपल्या पक्षाला पुढे नेत, TMC प्रमुख ममता बॅनर्जी यांनी  त्यांच्या पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सुकाणू समितीमध्ये इतर राज्यातील नेत्यांचा समावेश करता येईल. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी पक्ष विस्ताराचा कार्यक्रम सुरू ठेवणार असून विविध राज्यांचा दौरा करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्या मुंबईत येत आहेत.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशिवाय त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी 1 डिसेंबर रोजी मुंबईत उद्योगपतींना भेटतील आणि त्यांना पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रित करतील. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ममता बॅनर्जी उद्यापासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे हेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य आहे.


 त्याचवेळी, ममता बॅनर्जी यांच्या दक्षिण कोलकाता येथील निवासस्थानी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत अन्य राज्यांमध्ये पक्षाचा प्रवेश वाढवण्यासाठी घटनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिथे त्यांनी 1998 मध्ये काँग्रेसशी संबंध तोडून TMC स्थापन करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून पक्षाच्या नेत्यांनी सर्व महत्त्वाचे निर्णय घेऊन ममता बॅनर्जी यांनी टीएमसीला पुढे नेण्याचा विडा उचला आहे.