मुंबई : राज्यात शासकीय सेवेतील भरती घोटाळा अलिकडेच उघडकीस आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवण्याचं हे रॅकेट उजेडात आलं. पण त्यानंतरही असे प्रकार थांबलेले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अजून मोकाटच आहेत. अजूनही हे रॅकेट कार्यरत असल्याचं स्पष्ट होतंय.


मुंबईत 31 डिसेंबर रोजी एमपीएससीतर्फे कर सहाय्यक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत दोन डमी उमेदवार बसणार असल्याची माहिती योगेश जाधव या तरुणाला मिळाली. योगेश जाधवनंच याआधीच्या भरती रॅकेटचा पर्दाफाश केला होता. योगेशच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सापळा लावला आणि दोघा डमी उमेदवारांना रंगेहात अटक केली. संदीप भुसारी आणि सचिन नराले अशी त्यांची नावं असून, दोघेही विक्रीकर अधिकारी म्हणून सरकारी सेवेत कार्यरत आहेत.