मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेल्या मेट्रो साईटजवळ बॉम्ब सापडल्याचं समजतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ठिकाणी मेट्रो रेल्वेसाठी खोदकाम सुरू आहे. या दरम्यान मेट्रो साईटवर जमिनीच्या खाली लपवण्यात आलेले दोन क्रूड बॉम्ब सापडलेत.


हे बॉम्ब इथे कुठून आले? कुणी आणले? कशासाठी हे बॉम्ब बनवण्यात आले? हे इथे लपवून ठेवताना कुणाच्या नजरेस कसे पडले नाहीत? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत.