मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे लीलावतीत पोहोचले आहेत. संजय राऊत हे हॉस्पिटलमधूनही लिखाण करत असल्याचं एका फोटोत दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत हे काल छातीत दुखत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी त्यांनी ट्वीट केलं आहे, 'लहरो से डरकर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती.'


संजय राऊत रूग्णालयात आहेत, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे, तरी देखील त्यांनी आपली लेखणी बंद केली नसल्याचं दिसून येत आहे. संजय राऊत यांची सामनासाठी अग्रलेखाची धार अजूनही कायम आहे.


संजय राऊत यांना थोड्यावेळापूर्वी शरद पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी देखील भेट घेतली आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी याचं शिवसैनिकांना आश्वासक वाटेल असं ट्ववीटही केलं होतं.