मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्यात चर्चा झाल्याची बातमी हाती येतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे, शिवसेना आणि टीडीपी हे दोन्ही 'एनडीए'चे घटक पक्ष आहेत. भाजपवर नाराज असलेल्या उद्धव ठाकरेंनी भविष्यात भाजपशी युती करणार नसल्याचं जाहीर भाषणात म्हटलंय. 


दुसरीकडे, भाजपकडून सापत्न वागणुकीमुळे तेलगु देसम पक्षही नाराज आहे. टीडीपीनंही एनडीएमधून बाहेर पडण्याची धमकी दिलीय. 


त्यानंतर, आता उद्धव ठाकरेंनी चंद्राबाबू नायडूंशी फोनवर चर्चा केल्याच्या बातमीनं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.