Uddhav Thackeray Criticized on Shinde Government : सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईनंतर आता जनतेच्या दारात लढाई लढण्याचा इरादा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे. राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असून त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावे, असे आव्हानही ठाकरे यांनी शिंदे आणि फडणवीसांना दिले आहे. दरम्यान, 16 अपात्र आमदारांबाबत योग्य निर्णय न घेतल्याने पुन्हा कोर्टात जाण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. डबल इंजिनमधील पोकळ इंजिन बाजूला जाणार, असे यावेळी ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाने काल महाराष्ट्रात जे काही चालले आहे त्याबद्दल कठोर शब्दात फटकारले आहे. काल गदरांच्या माध्यमातून शिवसेना तुटली होती, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मी सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देतो. काल काही लोकांनी आनंद साजरा केला. भाजपने जल्लोष केला हे समजण्यासारखे आहे, पण गद्दारांनी का साजरा केला हे समजले नाही.


काल सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की त्यांच्यासमोर पोपट हयात नाहीत, विधानसभेचे अध्यक्ष आधी आमच्यासोबत होते, आता ते भाजपसोबत आहेत, कधी आणि कुठे जायचे ते त्यांनाच माहीत. राज्यात चोरांचे सरकार सुरु आहे. राज्याची बदनामी होत आहे. उद्धव यांनी राजीनामा दिला नसता तर आज ते मुख्यमंत्री झाले असते, असे काल सर्वोच्च न्यायालय म्हणाले, हे सरकार असंवैधानिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्या राजीनाम्याचे कारण तुम्हाला माहीत आहे, असे ठाकरे म्हणाले.


आता राज्यातील एकहाती सरकार संपले पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर मी राजीनामा दिला आहे. जनतेच्या दरबारात निर्णय व्हायला हवा, त्यांचा जो निर्णय असेल तो ग्राह्य असेल. अनिल परब, अनिल देशमुख, काबिल सिब्बल यांनी खूप मेहनत घेतली, आम्ही शिवसेनेसाठी नाही तर देशाची लोकशाही वाचवण्यासाठी लढतोय, असं काबिल सिब्बल म्हणाले होते. देशात हिंदूत्व आणि नैतिकता महत्त्वाची आहे, असे ठाकरे म्हणाले.


अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडेच !


सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवावे की नाही? यासंदर्भात आता राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  दरम्यान, उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सर्वोच्च न्यायालयासमोरील सुनावणीवर मेलेल्या पोपटाचं उदाहरण देऊन खोचक टिप्पणी केली आहे. अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतीलच. त्यांनी उलट-सुलट काही केलं तर ज्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, त्याचप्रमाणे जर इथे काही वेडंवाकडं झालं तर पुन्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. त्यानंतर जी काही बदनामी होईल, तेव्हा मात्र यांना जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.


माझ्याप्रमाणेच नैतिकतेला जागून या बेकायदेशीर सरकारने राजीनामा द्यायला हवा. न्यायालयाने सगळी लक्तरं वेशीला टांगल्यानंतर आपण सगळे निवडणुकीला सामोरे जाऊया. लोकशाहीत शेवटचं न्यायालय जनतेचं असतं. आपण जनतेच्या न्यायालयात जायला काय हरकत आहे?, असे ते म्हणाले.