मुंबई: केंद्रातील राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी दरवर्षी एक कोटी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते. त्या हिशेबाने मागील चार वर्षांत किमान चार कोटी नवीन नोकऱ्या निर्माण व्हायला हव्या होत्या. प्रत्यक्षात आज देशात तीन कोटी तरुण बेरोजगार आहेत आणि २४ लाख सरकारी जागाही रिक्त आहेत. देशातील बेरोजगारांचा ‘कारवाँ’ हा एका सरकारमागून दुसऱ्या सरकारमागे असाच सुरू आहे. तो थांबलेला नाही. उलट वर्षागणिक मोठाच होत चालला आहे. ‘आयुष्मान’मुळे त्यातील एक लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार असतील तर चांगलेच आहे, पण एक लाखाचे ‘ठिगळ’ कसे पुरणार? एक कोटी रोजगारांचे आश्वासन देणाऱ्यांच्या राज्यातही रोजगाराचे घोडे पेंडच खात असेल तर कसे व्हायचे?, असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 


गडकरी खरे बोलले!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले अश्वासन आणि प्रत्यक्ष सत्तेत आल्यावर पंतप्रधान म्हणून त्यांच्या सरकारचे धोरण, रोजगार निर्मितीचा वेग तसेच, देशभरात वाढलेली बेरोजगारी आदी मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या 'पण नोकऱ्या कुठे आहेत?' या विधानवरूनही उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केली आहे. 'केंद्रातीलच एक ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी एका प्रश्नावर उत्तर देताना (बोलण्याच्या ओघात का असेना) ‘नोकऱ्या कुठे आहेत?’ असे म्हणाले. त्याचा संदर्भ वेगळा असला तरी ते खरंच बोलले', असे उद्धव ठाकरे म्हणाले.


‘ठिगळ’ कसे पुरणार?


दरम्यान, ‘आयुष्मान’मुळे त्यातील एक लाख बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार असतील तर चांगलेच आहे, पण एक लाखाचे ‘ठिगळ’ कसे पुरणार? एक कोटी रोजगारांचे आश्वासन देणाऱ्यांच्या राज्यातही रोजगाराचे घोडे पेंडच खात असेल तर कसे व्हायचे?, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.