Milind Narvekar : उद्धव ठाकरेंचा `राइट हँड` नेमका कुणासोबत?
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) खरंच शिंदे गटात सामील होणार का, असा प्रश्न ज्याला त्याला पडला.
मुंबई : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) देखील शिंदे गटात (Eknath Shinde ) सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काय आहे यामागील नेमकं सत्य? नार्वेकर नेमके कुणासोबत आहेत? पाहूयात हा रिपोर्ट. गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. मिलिंद नार्वेकर, उद्धव ठाकरेंचा राइट हँड. नार्वेकर खरंच शिंदे गटात सामील होणार का, असा प्रश्न ज्याला त्याला पडला. मात्र मिलिंद नार्वेकरांनीच खास ट्विट करून या प्रश्नाचं उत्तर दिलंय. 5 ऑक्टोबरला शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची तयारी शिवाजी पार्कवर सुरूय. रविवारी रात्री साडे दहा वाजता नार्वेकरांनी या कामाची पाहणी केली. तिथूनच थेट उद्धव ठाकरेंना फोन लावून तयारीची माहिती दिली. त्यानंतर बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवाला भेट देऊन माँ दुर्गेचं दर्शन घेतलं. (uddhav thackeray group or eknath shinde group pa milind narvekar which group see full report)
एवढंच नव्हे तर दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी सोमवारी शिवसेना भवनात नेते आणि पदाधिका-यांची बैठक झाली. शिवसेना खासदार विनायक राऊत, अनिल देसाई यांच्यासह मिलिंद नार्वेकरही या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. नार्वेकर पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रीय झाल्याचं यातून स्पष्ट होतंय.
उद्धव ठाकरेंचे पीए असलेल्या मिलिंद नार्वेकरांच्या गणपतीच्या दर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. त्यात नार्वेकर शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केला. त्यानंतर चर्चेला उधाण आलं, हे मात्र निश्चित. राजकारणात कुणीचं कुणाचं कायमस्वरुपी मित्र किंवा शत्रू नसतं.