मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्धव ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. पण अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात पोहोचल्यानंतर विरोधी बाकांकडे जात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गळाभेट घेतली. त्यानंतर ते आपल्या जागेवर जावून बसले. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आणि सभागृताली आमदारांना आणखी एक वेगळं चित्र यावेळी पाहायला मिळाल. याआधी एकत्र काम करणारे दोन नेते आज एकमेकांच्या विरोधात बसले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचा आक्षेप


सभागृहाचं कामकाज सुरु होताच भाजपने अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतला. ज्यामुळे नंतर विधानसभेत गोंधळ देखील पाहायला मिळाल. विधानसभेचं कामकाज वंदे मातरमने का नाही झाली. नियमांच्या विरोधात अधिवेशन बोलवलं गेलं. यावर माजी मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला. पण हंगामी अध्यक्षांनी हा आरोप फेटाळून लावला.


देवेंद्र फडणवीसांनी संविधानानुसार शपथ घेतली गेलं नसल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या आरोपावर उत्तर देताना हंगामी अध्यक्षांनी म्हटलं की, ही सभागृहाच्या बाहेरची घटना आहे. त्यामुळे यावर येथे चर्चा होऊ शकत नाही. यावर फडणवीसांनी म्हटलं की, मी संविधानाबद्दल बोलत आहे. मला संविधानाबद्दल बोलायचा अधिकार आहे. जर मला संविधानाबद्दल बोलू दिलं जात नसेल तर या सभागृहात राहण्याचा मला अधिकार नाही. असं देखील त्यांनी म्हटलं.