उद्धव ठाकरे यांचा कारवाईचा धडाका, आणखी एका बंडखोर आमदाराची पदावरुन हकालपट्टी
आमदाराची पदावरुन हकालपट्टी, शिवसेनेने निवदेन केलं प्रसिद्ध
Uddhav Thckeray vs Eknath Shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर कारवाईचा धडाका लावला आहे. पक्षातून बंडखोरी केलेल्या आमदारांना पक्षातल्या पदावरुन दूर केलं जात आहे. त्यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे.
सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख या पदावरून तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेने निवेदनही प्रसिद्ध केलं आहे. तानाजी सावंत यांच्या जागी संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तानाजी सावंत हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या पुण्यातील कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. त्यानंतर तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांना इशारा दिला होता. पण आता थेट पक्षप्रमुखांनीच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला जाणार आहे. यावेळी निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागल्यास शिवसेनेची अडचण होऊ शकते.