Shinde vs Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत; शिंदे गटाचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाबाबतच शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) गटाचा वाद आता थेट पक्ष प्रमुख पदापर्यंत पोहचला आहे.
Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) गटातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. ठाकरे आणि शिंदे गटात सध्या धनुष्यबाण या चिन्हावरुन(Shiv Sena Symbol) सुरु असलेल्या लढाईत धक्कादायक ट्विस्ट आला आहे. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाबाबतच शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) गटाचा वाद आता थेट पक्ष प्रमुख पदापर्यंत पोहचला आहे.
शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रित होती
शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रित होती. पण, नंतर ती बदलत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेबद्दल निवडणुक आयागोसमोर माहिती दिली. चर्चेदरम्यान जेठमलानी यांनी पक्षाची रचना काय हे वाचून दाखवली.
शिवसेनेच्या घटनेत बदल करुन उद्धव ठाकरे यांनी खोटारडेपणा केला
बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा खोटारडेपणा आहे. हे बदल बेकायदेशीर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत असं महेश जेठमलानी यांचे एकनाथ शिंदे गटातर्फे म्हणणे आहे.