मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीच्या सरकारचा शपथविधी गुरुवारी शिवतीर्थावर पार पडलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी  शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंसहीत सात मंत्र्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.  हा सोहळा स्मरणीय करण्यासाठी शिवसेनेकडून तयारीत कोणतीही कसूर ठेवण्यात आलेली नाही. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी शपथविधीसाठी खास असे व्यासपीठ उभारले आहे. एकूणच शिवाजी पार्कमधील आजचा सोहळा हा लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.


असा संपन्न झाला शिवतीर्थावर शपथविधी सोहळा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

​* शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेताच निघून गेले.



​* महाराष्ट्रात 'ठाकरे राज'; उद्धव ठाकरेंसह सहा मंत्र्यांचा शपथविधी संपन्न


* काँग्रेसच्या नितीन राऊत यांना राज्यपालांकडून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ


* काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ


* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ


* राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ


* शिवसेनेच्या सुभाष देसाई यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ


* एकनाथ शिंदेनी बाळासाहेब ठाकरेंना स्मरून घेतली मंत्रिपदाची शपथ


* शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ



* उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.... महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री


* राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवाजी पार्कवर दाखल


* आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल



* राज ठाकरेंकडून व्यासपीठावर नेत्यांच्या गाठीभेटी


* शरद पवार शिवतीर्थाकडे रवाना, सिल्व्हर ओकवरुन पवार निघाले


* द्रमुक नेते स्टालिन, टी. आर. बालू, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते अहमद पटेल व्यासपीठावर उपस्थित


​* मातोश्रीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थाकडे रवाना​


* मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यासपीठावर दाखल


​* शिवाजी पार्कवर देशातील प्रमुख राजकीय नेते उपस्थित


​* केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार


* राज ठाकरे आणि अमित ठाकरे शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना.


* सोनिया गांधी शपथविधी सोहळ्याला येणार नाहीत, पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा


* शिवतीर्थावर शिवसैनिकांचा जनसागर


* शिवाजी पार्कपासून काही अंतरावर असलेल्या शिवसेना भवनाला आकर्षिक विद्युत रोषणाई


* उद्धव ठाकरे ६ वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.