मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराशी प्रत्यक्ष संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे आणि आमदार असा हा संवाद सुरु झाला आहे. काल पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील आमदारांशी उद्धव यांनी संवाद साधला. मतदार संघातील प्रश्न आणि राजकीय समीकरणं उद्धव ठाकरे आमदारांकडून समजून घेत आहेत. आणि स्वाभाविकपणे एक प्रश्न किंवा मत आमदारांना हमखासपणे विचारलं जातेय. सतेतून बाहेर पडावं की नाही ? आणि पडावं तर का आणि कधी ? आणि सत्तेत राहावं तर का ? 


खरं तर शिवसेनेच्या नाराजीची यादी लांबलचक आहे.


- केंद्राच्या भूसंपादन कायद्याला शिवसेनेचा विरोध
- शिवसेनेच्या विरोधानंतरही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा निर्णय
- मुंबईतील जागतिक वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलवले
- मुंबईतील एअर इंडियाचे मुख्यालय दिल्लीला हलवले
- शिवसेनेचा जीएसटीला विरोध
- नोटबंदीला शिवसेनेचा विरोध
- काश्मिर धोरणाबाबत शिवसेनेची नाराजी
- सत्तेत सहभागी होतानाच दुय्यम मंत्रीपदे 
- शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी अधिकार नसल्याच्या तक्रारी 
- कॅबिनेट मंत्र्यांनाही आपल्या खात्याचे निर्णय घेता येत नाहीत 
- पालकमंत्र्यांच्या नेमणुका विश्वासात न घेता केल्या
- शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात निधी मिळत नाही
- शिवसेनेच्या विरोधानंतरही आरेमधील मेट्री कार शेड उभारणीचा निर्णय
- शिवसेनेच्या विरोधानंतरही गिरगावमधून जाणाऱ्या मेट्रो तीनला मंजूरी
- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध 
- कर्जमाफीवरून मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका, सरकारमधून बाहेर पडण्याचाही इशारा
- शेतकरी आंदोलनात आणि संपात शिवसेनेचा प्रत्यक्ष सहभाग