`वसूल केलेला जीएसटी मोदी सरकार परत करणार का?`
केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये केलेला बदल हा अभिनंदनीय असला तरी इतके दिवस वसूल केलेला जीएसटी सरकार परत करणार का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.
मुंबई : केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये केलेला बदल हा अभिनंदनीय असला तरी इतके दिवस वसूल केलेला जीएसटी सरकार परत करणार का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.
जीएसटीतील बदल म्हणजे सरकार ताळ्यावर आल्याचं लक्षण आहे, असंही ते म्हणालेत. मुंबईतील शिवसेना भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव बोलत होते.
लक्ष्मीपूजन कसं करायचं?
विविध करांच्या रुपात सरकारनं जनतेची लक्ष्मी ओरबाडून घेतली. त्यामुळे येत्या दिवाळीत लक्ष्मीपूजन कसं करायचं? हा प्रश्न लोकांसमोर हा लोकांसमोर प्रश्न असल्याचंही उद्धव म्हणालेत.
वाढत्या करांमुळे देशात अस्वस्थता असल्याचा हल्लाबोलही उद्धव यांनी केलाय. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तीन विषय मांडले त्यापैकी अंगणवाडी सेविका आणि रेल्वे ब्रीजवरील फेरीवाले हटवण्याचा निर्णय असल्याचं सांगत या गोष्टींचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
भारनियमनाच्या मुद्यावरुनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शिवाय राणेंच्या मुद्यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय.