उद्धव ठाकरेंचा शपथविधी शिवतीर्थावरच पण तारीख बदलली
सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा शपथविधी १ डिसेंबरला शिवतीर्थावर होणार असल्याचे सांगितले जात होते.
मुंबई: महाविकास आघाडीकडून एकमताने मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या तारखेत बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचा शपथविधी १ डिसेंबरला शिवतीर्थावर होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची तारीख बदलण्यात आली आहे. आता त्यांचा शपथविधी २८ नोव्हेंबरला दुपारी पाच वाजता शिवतीर्थावरच पार पडेल. तत्पूर्वी उद्या सकाळपासून विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांना सदस्यत्वाची शपथ देण्यात येईल.
बारामतीचा 'बापमाणूस' ते महाराष्ट्राचा 'चाणक्य'... सर्वव्यापी शरद पवार
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज संध्याकाळी ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंती पाटील यांनी महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमताने मंजूर केला. यानंतर सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला.