मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारच्या काळातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत राज्यात कोणकोणते प्रकल्प सुरु आहेत? या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे? या प्रकल्पांचा एकूण खर्च किती आहे? त्यावर आतापर्यंत किती खर्च झाला आहे? कोणते प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करणं गरजेचं आहे? याबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री उपस्थित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नवीन सरकार आल्यानंतर काम करत असताना मुख्यमंत्री कोणकोणते प्रकल्प चालू आहेत त्याचा आढावा घेतात. या प्रकल्पांची प्रगती कुठपर्यंत आली आहे, काय अडचणी आहेत हे जाणून घेत असतात. त्यात नवीन असं काही नाही. प्रकल्पांसाठी किती खर्च येणार आहे? यावर पूर्ण अहवाल येईल, त्यावर विचारविनिमय होईल,' असं छगन भुजबळ म्हणाले. बुलेट ट्रेन हा पांढरा हत्ती आहे, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.


'कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही, पण जे प्रकल्प सुरु आहेत, त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली आहे. कोणताही प्रकल्प थांबवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही,' असं एकनाथ शिंदे म्हणाले.