Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आपल्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करणार आहेत. 'शिवसेना' (Shiv Sena) नाव निसटल्यानंतर पहिल्यांदाच ते आपली जाहीर भूमिका मांडणार आहेत. ( Maharashtra Political News in Marathi ) 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ( Political News ) त्यावेळी ते काय बोलणार याची उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शिवसेना' नाव आणि चिन्ह निसटल्यानंतर उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनानिमित्त मुंबईच्या मातोश्री सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे आपली जाहीर भूमिका मांडणार आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणता नवा मंत्र शिवसैनिकांना देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.


Uddhav Thackeray : आता उद्धव ठाकरे 'शिवसेना' हे नाव वापरु शकतात का?


गेले सहा महिने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात (Maharashtra Politcs) केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठा निर्णय देत धनुष्यबाण (Dhanushyaban) आणि शिवसेना (Shivsena) नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना हे नाव निसटले आहे. 


उद्धव ठाकरे यांच्याकडून 'शिवसेना' गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या 'या' फोटोची चर्चा


एकनाथ शिंदे हे 40 आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले आणि सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपबरोबर हात मिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा ठोकला होता. याबाबत ठाकरे गट आणि शिंदे गटाची कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर लढाई सुरु होती. निवडणूक आयोग लढाईत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे.