Aditya Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल 'शिवसेना' (Shiv Sena) हे नाव आणि 'धनुष्यबाण' शिंदे गटाला बहाल केले. (Maharashtra Politics) निवडणूक आयोगाने (Election Commission) शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना मानून ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याचे आदेश दिले. ( Maharashtra Political News in Marathi ) त्यामुळे ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना हिरावून घेतल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. या सगळ्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदत घेत प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली. तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची जोरदार चर्चा होत आहे. (Political News )
'मातोश्री'मधल्या एका खिडकीत बाळासाहेब ठाकरे उभे आहेत. त्यांच्या एका बाजूला उद्धव ठाकरे उभे आहेत. ते हसत बाहेर पाहात आहेत. तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आहेत. हा फोटो आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर आणि इंस्टावर पोस्ट केला आहे. या फोटोत आदित्य ठाकरे यांचा चेहरा गंभीर दिसत आहे. शिवसेनेत जून 2022 ला जी फाटाफूट झाली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत पक्ष सावरण्याचा आणि कार्यकर्त्यांना नवी उभारी देण्याचा केला आहे आणि करत आहेत. मात्र आज निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या प्रतिक्रियेऐवजी समोर आला तो त्यांनी पोस्ट केलेला फोटो.
आदित्य यांनी शिवसेना पक्षाचे संस्थापक प्रमुख आजोबा बाळासाहेब ठाकरे, वडील उद्धव ठाकरे आणि आपला फोटो पोस्ट केलाय. तीन पिढ्या या फोटोत दिसत आहेत. तीन पिढ्यांकडे असलेला 'शिवसेना' हा पक्ष निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिंदे गटाकडे गेला आहे. त्यामुळे आता पुढे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना संघर्ष करावा लागणार हे उघड आहे. काहीही बोलण्यापेक्षा आदित्य यांनी एक फोटो पोस्ट करत आम्ही संघर्ष करणार आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. या फोटोची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत आहे.
आदित्य ठाकरे यांनी पोस्ट केलेल्या या फोटोवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे म्हणजेच 'शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे' अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. 'ठाकरे सांगतील तोच आमचा पक्ष आणि ठाकरे सांगतील तेच आमचं चिन्ह' असं म्हणत आणखी एका युजरनेही प्रतिक्रिया दिली आहे.आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच असेही एकाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने (EC) शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना मानून ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याचे आदेश दिले. पक्षाच्या नियंत्रणासाठी प्रदीर्घ लढाईनंतर आपल्या 78 पानांच्या आदेशात आयोगाने उद्धव ठाकरे गटाला राज्यातील विधानसभा पोटनिवडणूक पूर्ण होईपर्यंत ‘मशाल’ निवडणूक चिन्ह ठेवण्याची परवानगी दिली आहे.