मुंबई : Uddhav Thackeray on Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल पदाचा अवमान करु इच्छित नाही. त्या खुर्चीचा मान, त्या खुर्चीत बसणाऱ्याने सुद्धा ठेवला पाहिजे. महाराष्ट्राच्या नशिबी असे लोक का येतात. तीन वर्षे महाराष्ट्रात राहून सगळं ओरबाडलं आहे. कोल्हापूरचा जोडा सुद्धा त्यांना दाखवायची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपाल यांना विधानपरिषद जागा भरण्यातही रस दिसत नाही. राज्यपाल नियुक्त सदस्य नेमुच नये, अशी तरतूदच त्यांनी करायला हवी. आज त्यांनी कहर केलाय दिल्लीतून अशी भाषणं त्यांना लिहून येतात का कल्पना नाही. ही मुंबई हक्काने मिळवली आहे. कोणी आंदण दिलेली नाही. मराठी माणसाच्या मनात त्यांनी आग लावलीच आहे. पण हे राष्ट्रपतीचे दूत असतात शपथ घेताना जात- पात धर्म बाजूला ठेवून ते वागणूक देतात. त्यांनी हे कर्तव्य मोडले आहे, त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? असे उद्धव ठाकरे  म्हणाले.


हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा गुन्हा त्यांनी केला आहे. त्यांना नुसतं घरी पाठवायचं की तुरंगात पाठवायचं हा विचार करण्याची वेळ आली आहे. सातत्याने ते वादग्रस्त विधाने करत आहेत. एकीकडे राज्यपालांच्या वक्तव्यावरून संतापाची लाट व्यक्त होत आहे. मात्र, ते कोणाच्या सांगण्यावरुन बोलत आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.



 हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे नीच काम त्यांनी केले आहे. ज्या महाराष्ट्रचे मीठ खात आहेत त्यात नमकहरामी केली आहे. हे पार्सल राज्यपाल पदाचा आदर राखत नसेल आगी लावत असेल तर तात्काळ वरिष्ठ थरावर निर्णय घ्यावा. त्यांच्या खुलासाबद्दल मला बोलायचं नाही. त्यांनी राज्यपाल पदाची शान घालवली आहे. त्यांचं वक्तव्य केवळ ओठातून की त्यांच्या पोटात बसून कोणी दुसऱ्याने आणलंय हा संशोधनाचा विषय. दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत आहे. तो का ? कारण पैसा अनावधनाने त्यांनी हा हेतू बोलण्यातून स्पष्ट केले आहे. त्यांचा डोळा मुंबईच्या पैशांवर आहे एवढेच सांगेन, असे ते म्हणाले.