मुंबई : नाशिकहून मुंबईमध्ये हजारो शेतकरी दाखल झाले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी हजारो शेतकरी पायी प्रवास करत मुंबईत पोहोचले. दरम्यान राजकिय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे.


राज ठाकरे घेणार भेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता सोमैय्या ग्राउंडवर या मोर्चाला भेट देणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रीया दिली आहे.


कर्जमाफीची रक्कम कुठे ?


मुंबईमध्ये शेतकऱ्यांचं स्वागतच आहे. कर्जमाफीची रक्कम कुणाकडे गेलीय,  याचा शोध घेणं गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं. 


शनिवार उन्हामध्ये देखील हा मोर्चा मुंबईच्या दिशेने येत आहे. सोमवारी शेतकरी मंत्रालयाचा घेराव घालणार आहेत. या मोर्चाला शिवसेनेसह, काँग्रेस, मनसे यांनी देखील पांठिबा दिला आहे.