मुंबई : 'झी २४ तास'च्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास शैलीत बेधडक उत्तरं दिली. उदयनराजे भोसले नेमके कोणाला घाबरतात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. 'तसं मी कोणालाच घाबरत नाही. कारण मी तत्व पाळणारा माणूस आहे. मी घाबरतो फक्त तत्वाला आणि वडिलकीच्या नात्यानं आईसाहेबांना घाबरतो', असं उत्तर उदयनराजेंनी दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आपला हात कॉलरला जाणारच. कारण दुसऱ्याच्या कॉलरला हात घालायची माझी सवय नाही. मी स्टाईल इज स्टाईल म्हणतो. कॉलर उडवल्यामुळे कामं होतात का? असा प्रश्न लोकं विचारतात. पण कॉलर उडवल्यामुळे कोणाचं वाईट तर होत नाही. आधी मी टेनिस बॉल होतो. टक्के टोणपे एवढे खाल्ले, आता चिक्की बॉल झालो आहे. आता बसला तर बसलाच', असं उदयनराजेंनी सांगितलं. 


मुक्त चर्चा | डॅशिंग उदयनराजे भोसले यांची बेधडक मुलाखत