चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगमध्ये कॅम्प नंबर तीनच्या फार्व्हड लाईन राधास्वामी चौकात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. राधास्वामी चौकात असलेल्या उंबराच्या झाडाला एक तरुण लटकलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसला. या तरुणाने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी (Ulhasnagar Police) घटनास्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भररस्त्यात तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान, हा तरुण याठिकाणी कसा आला तसेच त्याने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. भर चौकात घडलेल्या ह्या प्रकरणानंतर बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.


मद्यपी बापाने केली मुलाची हत्या


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात दारूच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर या निर्दयी बापाने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी गणेश विठ्ठल चौधरीने दारुच्या नशेच पत्नीला मारहाण केली होती. त्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. यातून गणेशने पोटच्या मुलाचा गळा दाबून खून केला. मुलाची हत्या केल्यानंतर गणेशने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पोलिसांनी जखमी गणेश चौधरीला उपचारासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. 


पुण्यात व्यावसायिकाची निर्घृण हत्या


बदनामी केल्याचा रागातून व्यावसायिकाची हत्या झाल्याचा प्रकार जुन्नर (Junnar) तालुक्यातील बेल्हे येथे घडला आहे. किशोर तांबे असं हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव असल्याचे समोर आले आहेत. किशोर तांबे 5 एप्रिलपासून बेपत्ता होते. शनिवारी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बदनामी केल्याच्या रागातून पांडुरंग जिजाबा तांबे व महेश गोरकनाथ कसाळ यांनी किशोर यांची हत्या करुन मृतदेह विहिरीत टाकला होता.