उल्हासनगर : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कधी प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते, तर कधी काही सत्य घटना समोर येत असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नेमकं व्हिडिओत असं काय आहे? आणि पोलिसांना का जबाबदार ठरवलं जातंय ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काय? 
सोशल मीडियावर एका गॅगस्टरच्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. या गॅंगस्टरने थेट पोलिस व्हॅनमध्येच वाढदिवस साजरा केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ऐरवी गॅंगसोबत वाढदिवस साजरा करणे ही सामान्य गोष्ट आहे, मात्र अटकेत असताना आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये वाढदिवस साजरा करणे ही फारच गंभीर बाब आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्न उपस्थित करत आहे.  


कोण आहे हा गॅंगस्टर? 
उल्हासनगरचा कुख्यात गुंड रोशन झा असे या आरोपीचे नाव आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. सुनावणीवरून परतल्यानंतर कोर्टहाउसजवळ उभ्या असलेल्या पोलिस एस्कॉर्ट व्हॅनच्या खिडकीतून त्याच्या मित्रांनी दिलेला केक कापून त्याने वाढदिवस साजरा केला होता. हा व्हिडीओ फक्त त्याच्या समर्थकांनीच सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.



हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.पोलिसांच्या व्हॅनमध्ये असतांना देखील हा गुंड केक कापत होता मात्र त्याला पोलिसांनी मज्जाव का केला नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, ठाणे पोलिसांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.