मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आज मुंबईतून आपली जनआशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra) सुरू करत आहेत. या यात्रेत शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही यात्रा वादळी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर राणे दिव्ंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे शिवाजी पार्कवर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नारायण राणे थोड्याच वेळात मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर नारायण राणे शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. तसेच  स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकालाही ते अभिवादन करणार आहेत. शिवाजी पार्कवर नारायण राणेंना विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जन आशीर्वाद यात्रेला (BJP Jan Ashirwad Yatra) मुंबईतून सुरुवात होत असताना यात्रेवर पावसाचे सावट आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच मुंबई मनपाने माहीम, शिवाजी पार्क भागात नारायण राणे यांचे शुभेच्छा बॅनर हटवले. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत, या भागातील बॅनर हटवले.



नारायण राणे यांचे सकाळी मुंबई आगमनानंतर शिवसेनेच्या गड असलेल्या शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राणे वंदन घालतील. तसंच तिथल्या परिसरात वृक्षारोपण देखील करणार आहेत. तिथपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात होणार आहे.