मुंबई :  तुमच्याकडे कार आणि बाईक असेल तर पुढील पाच वर्षानंतर तुम्हाला पेट्रोल मिळेल की नाही याची शाश्वती नाही. कारण पुढील 5 वर्षात देशात पेट्रोलचा वापर संपुष्टात येऊ शकतो. पेट्रोलच्या वापराबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हे मोठं विधान केलंय. असं काय घडणारंय, ज्यामुळे पेट्रोलचा वापरच संपुष्टात येईल. (union minister nitin gadkari has claimed that the use of petrol will come to an end in the next 5 years)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठं विधान केलंय. येत्या पाच वर्षात देशातून पेट्रोलचा वापरच संपुष्टात येईल असा दावा गडकरींनी केलाय. वाहनांमध्ये हळूहळू बायो-इथेनॉलचा वापर वाढतोय. याशिवाय विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येतं. 


त्यामुळे येत्या काळात सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनं, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि सीएनजीवरच चालतील असंही गडकरींनी म्हंटलंय. 


आगामी काळात भारतात इलेक्ट्रिक वाहनंच रस्त्यावर धावताना दिसण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असा अंदाज वाहन विषयक अभ्यास करणाऱ्या डेलॉईटनं व्यक्त केलाय. या अहवालात 59 टक्के भारतीय प्रदूषणाबाबत चिंतेत असल्याचंही नमूद करण्यात आलंय. 


त्यामुळे गडकरींच्या दाव्याप्रमाणे येत्या काळात लोकांचा कल इलेक्ट्रिक आणि ग्रीन हायड्रोजनवर चालणा-या गाड्यांकडेच असेल. तसं झालं तर पेट्रोल-डिझेलची गरजच संपुष्टात येईल यात शंका नाही.