मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दररोज देशभर दौरा करीत असतात. पण देशात सध्या संचारबंदी लागू असल्याने ते बांद्रा येथील आपल्या संविधान निवासस्थानी आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत. या काळात त्यांनी आपल्या काव्य रचना; ग्रंथ वाचन करत आहेत. तसेच कॅरम, पूल टेबल देखील खेळत आहेत. त्यांना आणखी एक आवड असलेलं गिटार वादन ही ते करताना दिसत आहेत. तसेच आरोग्याची काळजी घेताना स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा आणि व्यायाम देखील ते करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामदास आठवले गिटार वाजवत असताना त्यांच्या पत्नी सीमाताई आठवले यांनी ' मै तो जयभीम वाली हु ' हे गाणं गाऊन त्यांना साथ दिली. 



रामदास आठवले यांनी त्यांचा मुलगा कुमार जित सोबत कॅरम आणि पूल टेबल खेळण्याचा ही आनंद घेतला. संचारबंदी असल्याने घरातच राहून कोरोना विषाणूचा आपण मुकाबला करा. आवडत्या छंदाला वेळ द्या, कुटुंबाला वेळ द्या; ग्रंथ वाचन करा, योगा, विपश्यना करा, व्यायाम करा ,  स्वच्छ राहा, आनंदी राहा असे आवाहन त्यांनी केलं आहे.