सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : भारतीय (BJP) युवा मोर्चाची कार्यकारणी बैठकीचा उद्घाटन समारंभ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विद्यापीठ सुधारणा विधेयकावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यापीठ विधेयकाचा काळा कायदा या सरकारने पास केला आहे. आमची विद्यापीठं राजकारणांचा अड्डा पहायला मिळतील. इथे रोज भ्रष्टाचार पाहिला मिळेल, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मिरवले जाते पण या राज्य प्रतिगामी होत चाललं आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 


सेनेसोबत मतभेत असतील पण किमान आदित्य ठाकरे यांना विद्यार्थी विषयी कणव असेल असं वाटत होतं, पण विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे कायदे आदित्य ठाकरे यांनीह मंजूर केले असा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला आहे.


कुलुगुरुंचे सर्व अधिकार राज्य सरकारने आपल्या हातात घेतले आहेत, कुलुगुरु यांना बाबू बनवण्याचं काम राज्याने नवीन कायद्यानुसार केलं आहे, विद्यापीठ युवा सेनेचे अड्डे बनवण्याचं काम सुरु असून ठाकरे सरकार महाविकास आघाडी सरकार युवा पिढी बरबाद करत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.


आम्ही एकमताने जो कायदा केला त्या कायद्याला संपवण्याचं काम या कायद्याने केलं आहे, तुमच्या गाऊन घालण्याच्या शौकेपायी तुम्ही प्रकुलपती कायदा केला, मंत्र्यांच्या अधिकाराखाली मंहामंडळं तायर होतील, ती आता उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बस अशी होतील. निर्णय आता मंत्री घेतील, येत्या काळात कुणाला परीक्षा घेण्याचं कंत्राट द्यायचं हे देखील हेच ठरवतील असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. 


महाविकास आघाडी सरकार काळी कामं करतात तेव्हा हे कोविड दाखवतात आणि कोविडच्या मागे उभं राहून काळी कामं करतात, असा गंभीर आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पण विद्यार्थी हितासाठी आपल्याला कोविड नियम पाळून रस्त्यावर उतरुन काम करावंच लागेल, पोलीस केसला घाबरू नका, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.