विनाकारण हॉर्न वाजवण्याच्या वेडेपणावर पोलिसांकडून बसल्याजागी 60 सेकंदातच उपचार
सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणारे तुम्हाला नजर टाकली तिकडे दिसतील. कधी कधी विनाकारण हॉर्न वाजवणे
मुंबई : सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणारे तुम्हाला नजर टाकली तिकडे दिसतील. कधी कधी विनाकारण हॉर्न वाजवणे, हा मानसिक आजार बहुतांश चालकांना जडला आहे की काय असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. अनेक वेळा संपूर्ण रस्ताच आपला आहे, आणि वाहनावर नाही, तर हत्तीच्या अंबारीवरून सफर करत आहोत, आणि पूर्ण रस्ता काही सेकंदात आपल्याला मोकळा हवा आहे, यासाठी हॉर्नवर हॉर्न वाजवण्याचा सपाटा सुरूच असतो.
मुंबई पोलिसांनी मात्र हॉर्न वाजवण्याच्या या मानसिक आजाराला एक शक्कल लढवून आळा घातला आहे. 60 सेकंदाचा सिग्नल लागल्यावर जर 85 डेसिबल पेक्षा जास्त हॉर्नचा आवाज सिग्नलवर झाला, तर तो सिग्नल पुन्हा 60 सेकंदांनी वाढतो.
सिग्नलवरील वाहन चालक जेवढे जास्त हॉर्न वाजवतील, तेवढा जास्त वेळ तो सिग्नल घेणार आहे. तेव्हा फक्त सिग्नल लालचा पिवळा झाल्यावर मुकाट्याने वाट काढणे सोयीचे असणार आहे.
कारण पुढचा वाहन चालक काही सेकंद गाडी सुरू करण्यात घेतो, तरी देखील अरे सोया है क्या असं म्हणत जे हॉर्न वाजवण्याची सरबत्ती करतील, ती वाहनं सिग्नलवर वाटच पाहत बसतील.