यूपीए अध्यक्षपदासाठी पवारांच्या नेतृत्वाचं कौतुक करणाऱ्या राऊतांना कॉंग्रेसचा चिमटा
शिवसेनेनं यूपीएचं सदस्य व्हावं आणि अंतर्गत चर्चा करावी, असा चिमटा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काढलाय.
नवी दिल्ली : यूपीएचे नेतृत्त्व आणखी सक्षम झालं पाहिजे, असं म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वाचं कौतुक करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधानावर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना यूपीएचे सदस्य नाही त्यांनी यूपीएचं सदस्य व्हावं आणि अंतर्गत चर्चा करावी, असा चिमटा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काढलाय. संजय राऊत पत्रकार म्हणून बोललेले आहेत, असंही थोरात म्हणाले.
राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना याआधीच पंतप्रधानपदाची (Prime Minister's post) संधी मिळायला हवी होती. पण त्यांना पंतप्रधान होण्यापासून अडवण्यात आले, असे वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी याआधीही केले होते.
युपीए अध्यक्ष होण्याची शरद पवारांची इच्छा नसेल असं चिदंबरम यांनी म्हटलंय. युपीएचं अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नव्हे, सर्वात मोठ्या पक्षाचा नेताच युपीए अध्यक्ष होतो याची आठवण चिदंबरम यांनी करून दिली.
शरद पवारांना युपीए अध्यक्ष बनवण्याच्या मागणीवर काँग्रेसनं मौन सोडलंय. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे युपीएचा अध्यक्ष (UPA President) काँग्रेसचाच राहिलाय याची आठवण त्यांनी करून दिली. एएनआय या वृत्तसंस्थेला चिदंबरम यांनी फोनवरून दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलंय.
पद नसले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) आजही देशाचे नेतृत्व करत आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले आहे. ५० वर्षांत पवार यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांना अनेकांनी त्रास दिला. मात्र त्यांनी सामाजिक समतोल बिघडू दिला नाही, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते.