Urfi Javed vs Chitra Wagh : अभिनेत्री उर्फी जावेदला धमकी दिल्याप्रकरणी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध तक्रार
Urfi Javed : उर्फी जावेद हिला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात आता उर्फीच्या वकीलांनी तक्रार दाखल केली आहे.
Urfi Javed vs Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. सातत्याने चित्रा वाघ यांना डिवचणाऱ्या उर्फी हिने आता महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद हिला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल चित्रा वाघ यांच्याविरोधात आता उर्फीच्या वकीलांनी तक्रार दाखल केली आहे. (Latest Mumbai News Today)
मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी टीका केली होती. जिथे सापडेल तिथे उर्फीला थोबडवण्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला होता. इतकंच नाही तर भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अॅड. नितीन सातपुते यांनी चित्रा वाघ यांच्या विरुद्ध आयपीसीच्या 153(ए) (बी), 504, 506, 506(ii) च्या गुन्ह्यासाठी आणि मॉडेल, अभिनेत्री उर्फीला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. उर्फी हिने सार्वजनिक डोमेनवर तसेच Cr.P.C च्या 149 आणि 107 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची विनंती केली आहे. चित्रा वाघ या सतत मीडियावर धमक्या देऊन समाजातील शांतता भंग करत असल्याने तिच्याविरुद्ध प्रकरणाची कार्यवाही करावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. आज महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच अॅड. सातपुते महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भेट घेणार आहेत. यांना भेटणार आहे.
उर्फी विरोधात चित्रा वाघ आक्रमक
Urfi आपल्या तोकड्या कपड्यांमुळे आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहत होती. उर्फी जावेद पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. यावेळी महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन तक्रार दिली आणि कारवाईची मागणी केली. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन Urfi उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
कमी कपड्यात मुंबईच्या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या उर्फी जावेदवर त्वरीत कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी मुंबई पोलिसांकडे त्यांनी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फीचा व्हिडिओ शेअर करत ट्विटरवर पोलिसांकडे तक्रार केली होती. आता त्यांनी स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. उर्फीच्या अटकेची मागणीही त्यांनी केली आहे.