संजय दत्त याची मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी घेतली भेट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी अभिनेता संजय दत्त याची भेट घेतली.
मुंबई : भाजपने ‘संपर्क से समर्थन’ या अभियानाला सुरुवात केलेय. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिची तर उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुसऱ्या दिवशी मुंबई दौरा केला. वांद्रे येथील सलमानच्या घरी सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांची भेट घेतली. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी अभिनेता संजय दत्त याची भेट घेतली.
शाह यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत ‘संपर्क से समर्थन’ या अभियानांतर्गत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. केंद्र सरकारच्या चार वर्षांतील कामगिरीची माहिती पुस्तिका गडकरी यांनी त्यांना दिली. यावेळी नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली.
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी ‘संपर्क से समर्थन’ या अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील नामवंतांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शुक्रवारी गडकरी यांनी येस बँकेचे अध्यक्ष राणा कपूर यांचीदेखील भेट घेतली.