मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाध साधला. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार कंबर कसून मैदानात उतरली आहे. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रा दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी महाराष्ट्राला जनतेला राज्य सरकारने आतापर्यंत केलेली कामे आणि येणाऱ्या काळात सरकार आणखी काय काम करतंय याबाबत राज्यातील जनतेला माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं -


- राज्यातील प्रमुख उद्योजकांशी बोललो आहे. कामगार युनियनसोबत बोलला आहे. सर्व पातळीवर प्रयत्न करत आहोत. तिसरी लाट सर्वांच्या मदतीने थोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. 


- जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. एक कोटी 58 लाख जणांचे लसीकरण पूर्ण केले आहे. चाचण्यांच्या बाबतीत ही आपण एक नंबरचे राज्य आहे. 2 विनंती पंतप्रधानांनी मान्य केल्या आहेत. त्याबद्दल पंतप्रधानांने आभार मानले आहेत. 1 मे पासून 18 च्या पुढील वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्यांवर आहे. राज्यात 18 ते 45 दरम्यानचे 6 कोटी लोकं आहेत. 12 कोटी लसी यासाठी लागतील. लस विकत घेण्याची तयारी ठेवली आहे. 


- लसीच्या पुठवड्याबाबत मर्यादा आहे. दोन्ही कंपन्यांशी बोललो आहोत. लसीची उत्पादन क्षमता लक्षात घेतली तर आपल्याला 18 लाख लसी मिळणार आहेत. राज्याला असं पत्र आलं आहे. 


- आता थांबून चालणार नाही. लसीचा पहिला डोस देऊन पुढे जावं लागेल. सरकार ते दिल्याशिवाय राहणार नाही. उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरु करणार आहोत. जसे-जसे लसी उपलब्ध होतील तसं लसीकरण सुरु होईल.


- लसी उपलब्ध होत आहेत तसतसे या वयोगटात लस देण्यात येईल. सुरुवात हकुहळू असली तरी कृपया गोंधळ उडू देऊ नका. गर्दी करू नका


- केंद्राला विनंती की नोंदणी App सर्व राज्यांना वेगवेगळे उपलब्ध करून घ्यावे म्हणजे एकाच यंत्रणेवर ताण येणार नाही.


- मोठया प्रमाणावर लसीचा पुरवठा झाल्यास 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे सुरळीतपणे लसीकरण करण्याची राज्याची क्षमता आहे


- जूननंतर लसीचा पुरवठा वाढेल. लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका. उद्यापासून पहिला डोस दिला जाणार आहे. शेवटचा नाही. त्यामुळे घाई करु नका. असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी आवाहन केलं आहे.


- सध्या तरी राज्यात कडक लॉकडाऊन करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या स्थिरावली आहे. महाराष्ट्रातील जनता सहकार्य करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.