मुंबई : पुरेशा लस साठ्याअभावी आज मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरुप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने माहिती देण्यात येईल. दरम्यान, आज दिवसभरामध्ये लससाठा प्राप्त होण्याची शक्यता आहे.
 लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील दिवसापासून लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे  आवाहन करण्यात आले आहे.



दरम्यान, राज्यात काल 15169 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. बुधवारी नवीन 29270 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 5460589  रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 216016 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता  94.54 ट्क्के झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.



त्याचवेळी सामान्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. खासगी रुग्णालयातील कोरोनाचे दर नियंत्रणात आणले आहेत. याचे दर पालिका क्षेत्रानुसार ठरविण्यात आले आहेत. जी रुग्णालय जास्तीचे पैसे घेतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.