मुंबई : १ जानेवारी पासून भीमा कोरेगाव प्रकरणाचे लोण महराष्ट्रभरात पसरले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी 'महाराष्ट्र बंद' ची हाक देण्यात आली. यादरम्यान जाळपोळ, आंदोलन झाली. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक गजबजीची शहरं ठप्प झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून  राजकीय फायद्यासाठी भीमा कोरेगावची दंगल घडवली गेली आहे.. हे सगळं पूर्व नियोजित असून यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याचा कट असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी म्हंटलंय.
 


 समाजात फूट पाडून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न


 
संभाजी भिडे हे 80 वर्षांचे असून त्यांचा या दंगलीशी काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय.. तहीही संभाजी भिडे चौकशीला तयार आहे.. यात काही जण समाजात फूट पाडून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं वैद्य यांनी म्हंटलंय..