Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पण उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) युतीबाबत ठाम असल्याचं स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलं आहे. निवडणुका ठाकरेंसोबत लढवणार मात्र उद्धव ठाकरेंनीही त्यांची भूमिका जाहीर करावं असं म्हटलंय. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आमचा खिमा झाला तरी भाजपसोबत (BJP) गेलो नाही. उद्धव ठाकरेंनी महाविकासआघाडीत राहू नये असा संदेश दिल्याचंही आंबेडकरांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाबरोबर युती करणार?
शिंदेंनी भाजपला सोडल्यास वेगळा विचार करु अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिलीय. भाजपसोबत असणाऱ्या पक्षासोबत आम्ही जाणार नाही, कोणत्याही परिस्थितीत समझोता करणार नाही, भाजपसोबत किंवा त्यांच्या मित्रपक्षांसोबत जाणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मला माझी आणि माझ्या पक्षाची ताकद माहीत आहे, महापालिकेत आमची आणि सेनेची युती आहे पण ती सार्वजनिक जाहीर झालेलं नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सेना-वंचितची आघाडी होणारं, हे निश्चित असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.


कमिटमेंट चार भिंतीत
उद्धव ठाकरे यांनी कमिटमेंट दिली आहे,पण ही कमिटमेंट चार भिंतीतली आहे, ती अजून जाहीर करण्यात आलेली नाही, त्याची घोषणा कधी करायची हे उद्धव ठाकरे यांनी ठरवायचं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला फसवतील हे मी उद्धव ठाकरे यांना आधीपासून सांगत आलोय, काँग्रेस आणि शरद पवारांना माझ्या इतकं दुसरं कोणी ओळखणारा नेता नाही, त्यामुळे शिवसेनेने आघाडीसोबत युती करु नये असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


प्रकाश आंबेडकरांनी भूमिका जाहीर करावी
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना युती करण्याची आहे. मात्र कोण बरोबर करण्याची हे त्यांनी ठरवले पाहिजे असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. उध्दव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यासाठी राष्ट्रवादी नको आमच्या बरोबर युती करण्यासाठी भाजप नको असे त्यांचं मत आहे, त्यामुळे त्यांनी लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी असं शिरसाट यांनी म्हटलंय.