मुंबई : राजकीय वातावरण तापलेल्या कल्याण पश्चिम मतदारसंघात आता आणखी एका नावाची चर्चा सुरू झालीय. युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांना कल्याण पश्चिममधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. वरूण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मावसभाऊ आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य यांच्या जनआशीर्वाद यात्रेतही वरूण सरदेसाई मोठ्या प्रमाणात सहभागी होते. कल्याण पश्चिम हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात होता. मात्र जागावाटपात मतदारसंघांच्या देवाणघेवाणीत हा मतदारसंघ भाजपाने शिवसेनेला सोडला. 


आता कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेची उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे. कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढण्यासाठी ११ स्थानिकांनी उत्सुकता दाखवली आहे. मात्र प्रत्यक्षात बाहेरून उमेदवार देण्याची पक्षाची तयारी सुरू केलीय. 


शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचं नाव कल्याण पश्चिममध्ये शिवसैनिकांत नाराजी होती. आता वरूण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने आणखी एक बाहेरचा उमेदवार कल्याणकरांच्या माथी मारल्याची टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.