मुंबई : मोबाईलच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लहान मुलांचे अश्लील व्हीडीओ फॉर्वर्ड करणाऱ्या ग्रुप मेंबर्सना नवघर पोलिसांनी अटक केलीय. बॅड बॉईज, अपने रिस्क पे जॉईन करो अशा विविध नावांनी हे अश्लील ग्रुप चालवले जात होते. देशभरात तब्बल २२० ग्रुप मेंबर्स असल्याचं उघड झालंय. त्यातल्या ५ जणांना भाईंदर पोलिसांनी अटक केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पाच जण विरार, नालासोपारा, भाईंदर, नाशिक या भागातले आहेत. ज्या ग्रुप मेंबर्सनी असे अश्लील व्हीडीओ फॉर्वर्ड केले, डाऊनलोड केले, कॉमेंट केली अशा सर्वांवर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.