२४ तासानंतर वसईहून विरारला पहिली लोकल रवाना
पश्चिम रेल्वे हळहळू पूर्वपदावर
मुंबई : तब्बल २४ तासांच्या खोळंब्यानंतर आज वसईहून विरारच्या दिशेनं पहिली गाडी रवाना झाली आहे. सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी चर्चगेटहून वसई रोड स्थानकात आलेली गाडी विरारच्या दिशेनं सोडण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेनं सांगितंल आहे. सकाळच्या सत्रात विरारहून चर्चगेटच्या दिशेनं पाच लोकल गाड्या रवाना झाल्या होत्या. या गाड्या विरार ते नालासोपारा प्रवासात ताशी १० किमी वेगानं धावल्या. त्यामुळे आता तीन ट्रॅकवरची वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान, बोरीवली ते चर्चगेट वाहतूकही २० ते २५ मिनिटं उशिरानं सुरु आहे.
पश्चिम रेल्वेची वाहतूक दुपार पर्यंत पाऊस नसेल तर पूर्वरत होईल. एक्सप्रेसची वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागतील असं पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितलं आहे. चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाने वसई विरारची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. आता मात्र वाहतूक धीम्यागतीने सुरू करण्यात आली आहे.