#VedantaFoxconn - `ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण, तुम्हांला छत्रपती शिवरायांची आन`
वेदांता प्रकल्प पुन्हा राज्यात येण्याची शक्यता मावळली.. या नेत्याने सरकारला सुनावलं
Vedanta Foxconn project to Gujarat : वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प (Vedanta and Foxconn project ) गुजरातला (Gujarat) हलवण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra) आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. तब्बल 1 लाख 66 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव (Pune Talegoan) इथं होणार होता. पण आता या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचं वेदांत समूहाने (Vedanta Group) जाहीर केलं आहे. या प्रकल्पामुळे लाखोंचा रोजगार आणि शेकडो कोटींच्या कर महुसालाला महाराष्ट्राला मुकावं लागणार आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होण्याची शक्यता होती. असे असताना वेदांता आणि फॉक्सकॉनचे प्रकल्प गुजरातला गेलेच कसे, असा सवाल माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल शिंदे सरकारला (Shinde Government) विचारला होता. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर प्रकल्प गेल्याची कारणं शोधणार आहोत, अशी सारवासारव उद्योगमंत्र्यांना करावी लागली होती.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही ट्विट केलं असून राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण,
तुम्हांला छत्रपती शिवरायांची आन
दाखवा थोडी तरी अस्मिता,
थोडा तरी स्वाभिमान.
आज मात्र झुकली महाराष्ट्राची मान
तुडवू नका पायदळी महाराष्ट्राच्या मातीची शान ..
तुम्हाला शिवरायांची आन ..
#VedantaFoxconn
राज ठाकरे यांनीही सुनावलं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही सवाल करत सरकारला जाब विचारला आहे. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असेृं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. फॉक्सकॉन प्रकरणी राज ठाकरे यांनी चौकशीची मागणी केली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव इथं होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचा मविआ सरकारवर आरोप
दरम्यान, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आघाडी सरकारवर फोडलं आहे. आमच्या नव्या सरकारनं वेदांता फॉक्सकॉनला तळेगावजवळ 1100 एकर जमीन देऊ केली होती. 35 हजार कोटींच्या सबसिडी ऑफर केल्या. 'पण आधीच्या 2 वर्षांत प्रतिसाद कमी पडला असावा...' असे सांगत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारवर जबाबदारी ढकलली.