मुंबई : भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. लांबलेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट आणि आवकही घटल्याने याचा भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे.  तर सर्वसामान्यांना कांदाही रडवत आहे. गेल्या काही दिवसांत भाज्यांचे भाव कडाडलेत. अधूनमधून सुरू असलेल्या पावसाचा भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर चांगलेच वाढलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भाज्याची आवक ३० ते ४० टक्के कमी झाली आहे. त्यामुळे भाज्या कडाडल्या आहेत. तर कांदा सध्या ग्राहकांना राडवत आगे. पावसामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आणि आता त्याला भावही मिळत नाही. नुकतंच शेतकऱ्यांनीही आंदोलन केल्यामुळे मुंबईत कांदा महाग झाला आहे. परवापर्यंत ३० ते ३५ रुपयांनी घाऊक बाजारात विक्रीसाठी आलेला कांदा आज ४० ते ४५ रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना हाच कांदा ५० ते ५५ रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. 


भाज्यांचे दर (किलो)

भाजी  आजचे भाव मागील भाव
शिमला मिरची  ८० ६०
भेंडी ४० ४४
मटार १४० १२०
फरस बी १४०  
टॉमेटो ८० ६०
गवार  ७० ६०
कोबी ४० २०
दुधी ६०  ४०
वांगी  ६० ४०
काकडी ३० २८
प्लॉवर  ६० ५०
गाजर ६० ४०