मुंबई : भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे, ताटातल्या भाज्या सध्या गायब झाल्या आहेत. भाजी खरेदीसाठी आता ५०० रूपयेही कमी पडू लागलेत.ही व्यथा आज सर्वसामान्य गृहीणींप्रमाणेच नोकरी करणाऱ्या महिलेची ऐकायला मिळतेयं....कारण,त्यांचं महिन्याचं बजेटच कोडमडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवकाळी पावसानं सर्वच भाजीपाल्याचं नुकसान झालं आणि भाजीपाल्याचे भाव अक्षरश: गगनाला भिडले....या भावांवर नजर टाकली तर, तुमच्याही लक्षात येईल काय साधी पाचशे रूपयांची नोटही या भाजी खरेदीसाठी कमी पडते....ती कशी त्याचा हा हिशोबही पहा...


भेंडी - ५० रू. किलो
फ्लॉवर - ४० रू.किलो
दुधी - ४० रू. नग
कांदे - ६० रू. किलो
गाजर - ५० रू. किलो
बीट - ४० रू. किलो
टोमॅटो - ३५ रू. किलो
कोथिंबीर जुडी - ५० रू. जुडी


त्यामुळे रोजच्या ताटातल्या भाज्या गायब झाल्यात.वाढलेल्या किंमतीत भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहक टाळाटाळ करतायत, असंही भाजी विक्रेत्याचं म्हणणं आहे..


पावसानं, शेतकऱ्यांच्या शेतातली पिकं आडवी झाली....तर, इथे सर्वसामान्यांनाचे खिसे जीवनावश्यक वस्तूंसाठी रिकामे झालेत.