COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरूणींना एका वाहनाने धडक दिली आहे, यात २ तरूणी गंभीर जखमी झाल्या आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मुलींची पोलीस भरतीसाठी धावण्याची चाचणी आज होती, ती चाचणी पूर्ण करून या मुली विक्रोळी स्थानकाकडे जात होत्या, त्यावेळस या ४ तरूणींना एका गाडीने उडवलं. या गंभीर अपघातात या मुली जखमी झाल्या आहेत, त्यांना पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हा अपघात झाला. हा अपघात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेतील कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात 


जखमी झालेल्या मुलींचं नाव काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे आणि चैताली दोरगे असे आहे. घोडा गेट सिग्नलजवळ चैताली दोरगे आणि तिच्या तीन मैत्रिणी रस्ता ओलांडत होत्या.