मुंबई :  व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ झालेय. चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल, असे आयसीआयसीआय बँकेने जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, याआधी व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी सेक्युरिटीज् अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना नोटीस जारी केली आहे.  खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या बँकेने शेअर बाजाराला कोणती माहिती दिली. न्यूपावरमध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचे आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. दरम्यान, बँकेने म्हटले होते की, सेबीला उत्तरादाखल योग्य ते स्पष्टीकरण दिले जाईल. मात्र, आता बॅंकेने चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याने चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ झालेय.


काय आहे हे प्रकरण? 


आयसीआयसीआय बँकेमार्फत २०१२मध्ये व्हिडिओकॉनला ३,२५० कोटी रूपयांचे कर्ज दिले गेले होते. या प्रकरणी तसेच, या कर्जाप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्या संदिग्ध भूमिकेशी संबंधीत आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. प्रसारमाध्यमांतील माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेसह बँक समुहाकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांनी कथित रूपात न्यूपावर रिन्युएबल्समध्ये ६४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली.


दरम्यान, या कंपनीला धूत यांनी दीपक कोचर आणि दोन अन्य नातेवाईकांच्या माध्यमातून उभे केले. असाही आरोप आहे की, आयसीआयसीआयने बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर ६ महिन्यांनी धूत यांनी कपनीचे हक्क दीपक कोचर यांच्या एका ट्रस्टला ९ लाख रूपयांमध्ये ट्रन्सफर केले. दरम्यान, अशा प्रकारचा कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे बँकेने म्हटले  होते. असे असताना आता बॅंकेनेच चौकशी करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार अज्ञात 'व्हिसल ब्लोअर'ने केलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी केली जाईल. चौकशी समितीचे अध्यक्ष, समितीचे अधिकार आणि चौकशीचा कालावधी याबाबतचे सर्व निर्णय ऑडिट कमिटी घेईल, असे बँकेने स्पष्ट केले.