Vidhan Parishad Election : रामराजेंच्या कोट्यातील एक मत बाद, राष्ट्रवादीला फटका बसणार?
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, थोड्याचवेळात निकाल हाती येणार
मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पण राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळत काँग्रेसला झटका दिला आहे. काँग्रेसकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचा विषयी आक्षेप नोंदवला होता. या आमदारांऐवजी त्याचे समवेत इतर सहकारीने मतपत्रिका बाँक्स मध्ये टाकल्या असा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला होता.
त्यानंतर आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रामराजे निंबाळकरांच्या कोट्यातील एक मत बाद झालं आहे. यावरु भाजप-मविआत वाद झाला. तिसऱ्या पसंतीवर मतपत्रिकेत पेनानं गिरवल्याने आशिष शेलारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आक्षेप असलेली मतपत्रिका बाजूला काढण्यात आली.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.