आता वेध विधान परिषद निवडणुकीचे, भाजपने ठेवली ही अट
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या १० जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने महाविकास आघाडीसमोर एक अट ठेवली आहे.
मुंबई : विधानपरिषदेच्या १० रिक्त जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी एका उमेदवाराला २७ मतांचा कोटा आहे. यानुसार भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.
विधान सभेतील संख्याबळानुसार विधान परिषदेत भाजपचे ( BJP ) चार उमेदवार तर शिवसेना ( SHIVSENa ), एनसीपीचे (NCP ) दोन आणि काँग्रेसचा ( CONGRESS ) एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मात्र, काँग्रेसला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
मात्र, राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषद ( VIDHAN PARISHAD ) निवडणुकीतही भाजप एक अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप ( BJP ) पाचवी जागा लढण्याची तयारी करत आहे.
राज्यसभेसाठी निवडणूक झाली तर भाजप विधान परिषदेसाठी पाचवा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. परंतु, महाविकास आघाडीने ( MAHAVIKAS AGHADI ) राज्यसभेसाठी ( RAJYSABHA ) चौथा उमेदवार मागे घेतला तर भाजप विधान परिषदेसाठी चार उमेदवार देणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजपाने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेने राज्यसभा निवडणूक प्रतिष्टेची केली आहे. संजय राऊत ( SANJAY RAUT ) आणि संजय पवार ( SANJAY PAWAR ) यांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्षांची बैठकी बोलावली होती.
तर, कोणत्याही परिस्थितीत शिवसेनाच दुसरा उमेदवार निवडून येणार नाही यासाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. यासाठी भाजपने विधान परिषदेसाठी ही अट महाविकास आघाडीसमोर ठेवल्याची चर्चा रंगली आहे.