VidhanParshad Election : आतापर्यंत 203 आमदारांचं मतदान, भाजप आणि काँग्रेसमध्ये दहाव्या जागेसाठी काँटे की टक्कर
विधान परिषद निवडणुकीची कमान मुख्यमंत्र्यांच्या हाती, मतदानापूर्वी सेनेच्या प्रत्येक आमदाराला मार्गदर्शन
Vidhan Parishad Election : राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.
आतापर्यंत २०३ आमदारांनी मतदान केलंय. नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटीलही मतदानासाठी पोहोचलेत. माणिकराव कोकाटे अद्याप ही विधान भवनात मतदानासाठी पोहचले नाहीत. भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीही मतदान केलंय.
शिवसेनेची कमान मुख्यमंत्र्यांची हाती
विधान परिषद निवडणुकीची कमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातात घेतलीय. शिवसेनेचे सर्व आमदार मतदानापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कार्यालयात भेटत आहेत. तिथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक आमदाराला कोणाला कसं मतदान करायचं याचं मार्गदर्शन करत आहेत.
शिवसेनेच्या आमदारांना कोणाला मतदान करायचं, याचे आदेश फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितलेली माहिती बाहेर फूटू नये यासाठी प्रत्येक मतदार आमदारासोबत एक विधान परीषदेचा आमदार मतदान केंद्रापर्यंत सोबत करण्यात आलाय.
मुक्ता टिळक यांचं मतदान
पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी विधान परिषदेसाठी मतदान केलंय. मुक्ता टिळक या कॅन्सरनं त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरुयत. मात्र तरीदेखील मतदान करण्यासाठी त्या विधानभवनात आल्या. पक्षाने दिलेले आदेश मानायचे हे पहिल्यापासून आमच्या रक्तात आहे. त्यामुळे मतदाना केल्याचं मुक्ता टिळक यांनी सांगितलं.