अमित जोशी, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती नाट्यमय घडामोडींनंतर झाली. २८८ पैकी १६४ जागांवर भाजप आणि १२४ जागांवर शिवसेना लढणार आहे. भाजपच्या १६४ जागांमध्येच मित्रपक्षाला जागा देण्यात येणार आहेत. सुरुवातीला मित्रपक्षांना १८ जागा मिळतील, असं बोललं जात होतं, पण आता त्यांना १४ जागाच सोडल्याचं स्पष्ट झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीतल्या चारही मित्रपक्षांनी प्रत्येकी १० पेक्षा जास्त जागांची मागणी केली होती. पण भाजपने प्रत्यक्षात मित्रपक्षांना कमी जागा दिल्या आहेत. यामध्ये रामदास आठवलेंच्या आरपीआयला ६ जागा, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला ३ जागा, विनायक मेटेंच्या शिवस्वराज्य संघटनेला ३ जागा आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला २ जागा सोडण्यात आल्या आहेत.


गंमत म्हणजे फलटणच्या जागेवर आरपीआय आणि रयत क्रांती संघटना या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. तर आरपीआयला मिळालेल्या मानखुर्द शिवाजी नगरच्या जागेवर शिवसेनेने विठ्ठल लोकरेंना एबी फॉर्म दिला आहे. त्यातही काही ठिकाणी तर भाजपने स्वत:चेच उमेदवार देत पुन्हा एकदा मित्रपक्षांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण नाराज आणि असमाधानी असलो तरी भाजपबरोबर असल्याचं मित्रपक्षांनी स्पष्ट केलं आहे.


आरपीआयला मिळालेल्या जागा


मानखुर्द शिवाजी नगर (मुंबई)- गौतम सोनावणे


फलटण- दीपक निकाळजे


पाथरी- मोहन फड


नायगाव (नांदेड)- राजेश पवार


राष्ट्रीय समाज पक्ष (महादेव जानकर)


दौंड


जिंतूर


शिवस्वराज्य पक्ष (विनायक मेटे)


वर्सोवा


किनवट (नांदेड)


चिखली (बुलडाणा)


चौथी जागा निश्चित नाही


रयत क्रांती संघटना (सदाभाऊ खोत)


पंढरपूर


अक्कलकोट


फलटण