मुंबई : विहंग सरनाईक आज ही ईडी कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर राहिले. आज सकाळी 11 ते 1 या वेळेत त्यांना ईडीकडून हजर राहायला सांगण्यात आलं होतं. आमदार प्रताप सरनाईक यांचे पूत्र आहेत विहंग सरनाईक. विहंग सरनाईक यांना ईडी अधिकाऱ्यांनी समन्स द्वारे चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगितले होते. पण ते हजर न राहिल्याने आता ईडी विहंग यांच्यावर कडक कारवाई करण्याची श्यक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे प्रताप सरनाईक यांना गुरुवारी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने 25 नोव्हेंबर रोजी आमदार प्रताप सरनाईक आणि त्याचा मुलगा विहंग आणि प्रवेश सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले. त्यानंतर विहंग यांची सुमारे 4 तास ईडीकडून चौकशी केली गेली. यानंतर प्रताप सरनाईक यांनाही नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलविण्यात आले. परंतु प्रताप सरनाईक यांनी क्वारंटाईन असल्याचे सांगून एक आठवड्याचा कालावधी मागितला होता.


प्रताप सरनाईक यांनी मागितलेला एक आठवड्यांचा कालावधी आता संपत आला आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा सरनाईक यांना नोटीस पाठवून ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने सरनाईक यांचा मुलगा विहंग यांना नोटीस पाठविली आणि चौकशीसाठी बोलावले. परंतु विहंग सरनाईक ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले नाहीत.


जेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने प्रताप सरनाईक आणि त्याचा मुलगा विहंग आणि पुरवेश यांच्या घर व कार्यालयावर छापा टाकला. तेव्हा आमदार प्रताप सरनाईक परदेशात होते.